पान:तुतीपासून रेशीम.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७५ नयेत. कोसले वाळविल्यानंतर ते सांठवावेत. कोसले सांठ- विण्याच्या जागेतील हवा ओलसर असावी. ओलसर हवेंत सांठविलेल्या कोसल्यांचें रेशीम काढण्यास मेहनत कमी लागते, तसेंच त्यांवर तकाकी चांगली मारते. व त्यांच्या तारेंत चांगला जोर असतो. कोसले सांठवून ठेवल्यावर त्यांस मुंग्यांपासून किंवा उंदरांपासून उपद्रव होऊं नये, अशी व्यवस्था करावी. कातऱ्या व दरात्या. झाडाच्या ढाप्या छाटावयास फांद्या कातरण्याच्या कात- रीचा उपयोग करावा. विळ्यानें ढाप्या तोडल्यास त्या साफ कापल्या जात नाहींत. बंगाली लागवडीचा पाला छाटून आणावयास दरात्याचा उपयोग करावा. पीक काप- तांना उजव्या मुठींत फांद्यांचा झुपका हातांत धरून तळा- पासून दुसऱ्या हातानें फांद्याचे झुपकेच्या झुपके छाटून घ्यावे. झाडे कापावयास कातऱ्यांचा व बंगाली लागवड छाटावयास दरातींचा उपयोग करावा. पेट्या वगैरे किरकोळ सामान. या साहित्यापैकीं जें कांहीं वारीक सारीक सामान असतें तें ठेवण्यास व चुना वगैरे आर्द्रताशोपक पदार्थ ठेवण्यास पेव्या लागतात. चुन्याकरतां नेहमी दोन पेट्या घरांत ठेव- लेल्या असाव्या. या सामानाशिवाय तरट, कपडा, दिवा वगैरे किर-