पान:तुतीपासून रेशीम.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पट्याचा किडा झिवन्यासारखा दिसतो. पांढऱ्या किड्यास कपाळावर नाम असतो. वार्षिक किड्यांत युरोपियन व बडे किडे येतात, व द्वैमासिकांत निस्तरी, चिना, आणि छोटे किडे येतात. वार्षिक किड्यांची अंडी फुटावयास १० ते ११ महिने लागतात, व द्वैमासिकांच्यास आठ ते दहा दिवस पुरे होतात. अंडीं फुटल्यापासून किडे पिकून कोसले तयार करूं लागण्यास दोन्ही वर्गाचे किड्यांस हवेच्या मानाप्रमाणें वीस ते चाळीस दिवस लागतात. ह्मणजे सुर्वंटाच्या स्थितींत वरील दोन्ही वर्गांचें आयुष्य हवेच्या मानाप्रमाणें वीसपासून चाळीस दिवसांचे आंतच असतें. युरोपीय किड्यांचे कोसले मोठे घट्ट असून त्यांचा आकार साधारणतः जांभळाचे बी- प्रमाणें पण जरा मोठा असतो, व त्यांवर तकाकी चांगली असून त्यांचा रंग मोतिया रंगासारखा असतो. बड्या किड्यांचे कोसले वरीलप्रमाणेंच घट्ट असून त्यांचा रंग पांढरा, पांढरा- काळसर, पांढरापिवळट, व फिकट हिरवा असा असतो. या किड्यांपासून निघालेल्या रेशमावर देखील तकाकी चांगली मारते. निस्तरी कोसले लांबट गोल असून त्यांचा रंग पांढरा व पिंवळा असतो. व छोट्या किड्यांचे कोसले पिवळे लांबट गोल असून साधारण अणीदार असतात. वार्षिक किड्यांच्या जातीपेक्षां द्वैमासिक किड्यांपासून रेशीम निम- पटीनें कमी मिळतें. बंगाल व मैसूर प्रांतांतील लोकांचा निस्तरी व छोटे किडे पाळण्याकडेच विशेषतः कल दिसून येतो. युरोपीय व बडे किडे यांपासून रेशीम जास्त मिळत