पान:तुतीपासून रेशीम.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७४ चूद विषारी असतो, ह्मणून तो मुलांच्या हातास न लागेल, अशा ठिकाणीं ठेवावा. चंदरक्या सांठविण्याची जागा. चंदरक्यांचा उपयोग किडा पिकत असतानांच होतो. अवांतर वेळी त्या नुसत्या सांठवून ठेवावयाच्या असतात. त्याकरितां सावलीची जागा असावी. जेथे मोठ्या प्रमाणा- वर किडे पाळावयाचे असतात व जेथें दोनशे तीनशे चंद- क्या लागतात, तेथें त्या सांठविण्यास निराळें घर असल्यास विशेष वरें. गवताच्या छपरीचें घर करून भिंती ऐवजीं तय्याचा कूड करावा, व त्यांत चंदरक्या उभ्या करून ठेवाव्या. ह्मणजे घडवंचीसारखे कायमचे माचे करून त्यांवर चंद्ररक्या उभ्या सांठवून ठेवाव्या. तसेंच, सुपल्या सांठविण्यास देखील त्यांतच जागा असावी. सुपल्या सांठविण्यास देखील माचोळी असावी. णजे दोन्ही वस्तु अशा ठेवाव्या कीं, त्यांस वाळवीचा उपद्रव होतां कामा नये. शुद्ध केल्याशिवाय घरांत कोण- तीही वस्तु सांठवू नये. आळसानें अशुद्ध तव्या अथवा एक दोन चंद्ररक्या आंत ठेवल्यास पुन्हां सर्व शुद्ध केल्या- शिवाय उपयोगांत येत नाहींत. कोसले ठेवण्यास जागा. जेथे मोठ्या प्रमाणावर किडे पाळण्याचे काम चालू असतें तेथें कोसले सांठविण्याकरितांही निराळी जागा असलीच पाहिजे. किडे पाळण्याच्या घरांत ते केव्हांही सांठवून ठेवू