पान:तुतीपासून रेशीम.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७३ उपयोगांत घेतलेल्या पत्र्या देखील मोरचुदाचे पाण्याने धुवून नंतर पुन्हा उपयोगांत आणण्याकरितां सांठवाव्या. एक मनुष्य शेवटच्या पांच दिवसांत तीन हजार किड्यांचीं अंडी पारखूं शकतो. मोरचूद, गंधक व चुना. रोगट जंतूंनी किडे व्यापले जाऊं नयेत, तसेंच किड्यांचे पीक खात्रीने घेतां यावें, आणि घरांत झालेल्या रोगट जंतूंचा नाश व्हावा, ह्मणून मोरचूद, गंधक व चुना, यांचा उपयोग करावा लागतो. किडे पाळणारांनीं आपल्या साठ्यांत पांच शेर मोरचूद, दहा शेर गंधक, व दोन मण चांगल्या भाज- लेल्या चुन्याच्या कळ्या हरहमेषा ठेवल्या पाहिजेत. रोगट जंतूंचा संशय आल्यास आपल्याला ताबडतोब ह्यांचा उपयोग करतां यावा, ह्मणून हमेषा ह्या जिनसा साठ्यांत ठेवाव्या. मोरचूद व गंधक ठेवण्याकरितां झांकणाच्या बरण्या उपयोगास घ्याव्या. व चुन्याच्या कळ्या ठेवण्यास बाहेरील हवेचा परिणाम होऊ नये अशा झांकणाच्या पेटीचा उप- योग करावा. कळ्या व चुन्याची भुकणी हमेषा तयार ठेवावी. कळ्या वान्यांत राहिल्या असतां कांहीं दिवसांनी त्यांची ओलावा शोषण्याची ताकत नाहींशी होते. ह्मणून त्या हमेषा पेटीत बंद करून ठेवाव्या. मोरचुदाचीही भुकणी करून ठेविली असतां आयत्या वेळीं भुकणी करण्याची जरूर नाहीं. तसेंच गंधकाचीही पुड करून ठेवावी. मोर- ७