पान:तुतीपासून रेशीम.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७२ वर घेऊन पातळ पसरावा, व ती कांच सूक्ष्मदर्शक यंत्रा- खालीं ठेवून त्यांत जंतु आहेत कीं नाहींत, हें पहावें. यंत्रा- खालील आरशाने सर्व उजेडाचीं किरणें यंत्राचे तोंडावर घ्यावी. नाहीं तर कांहीं दिसणार नाहीं. यंत्राखालीं कांच ठेवल्यावर यंत्र वर खाली करण्याच्या स्क्रूनें उजवीकडून हळूच खालील कांचेवरील पदार्थ दृष्टीचे टप्यांत येई पावेतों फिरवावें. सूक्ष्मदर्शक यंत्राचा लेहाचे कांचेवर दाब बस - णार नाहीं, इकडे लक्ष्य द्यावें. नाहीं तर पदार्थ विस्तृत दाख- विणारी सर्वांत खालची कांच फुटेल. किड्याच्या रसानें बरबटलेल्या कांचा मोरचुदाच्या पाण्याच्या वाटीत टाकाव्या. नाहीं तर रसांत असलेले रोगाचे जंतु रस वाळल्यावर धुरळ्यांत मिसळतील. किडा चिरडलेल्या कागदावरील लेह तपासल्यावर त्या लेहामुद्रां तो कागद चिटोन्याच्या टोक- रीत टाकावा. फुलपाखरे तपासतांना सूक्ष्मदर्शक यंत्रानें दिसणाऱ्या जागेच्या टप्यांत रोगाचा जंतु एखादा दिस- ल्यास त्यांनी घातलेली अंडी निकामी ठरवावी. एका जागी जंतु दिसले नाहींत, तर इकडे तिकडे अनेक जागीं कांच हलविण्याची जरूर नाहीं. किड्यांनी घातलेली अंडी रोगट दिसल्यास त्या अंड्यांवरील पत्री काढून टाकावी, व त्यावर अंडीं खराब असल्याची खूण करावी. याप्रमाणे एका दिव- सांत एक मनुष्य चांगल्या रीतीनें अडीचशे ते तीनशें फुल- पाखरें तपासूं शकतो. चांगली संवय असल्यास एक माणूस पांचशेपासून सहाशें पावेतों देखील अडीं तपासूं शकेल.