पान:तुतीपासून रेशीम.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७१ सण्याचें काम लांबणीवर टाकावें. यामुळे असें होतें कीं, रोगाचे जंतु तितक्या अवकाशांत मादीचे पोटांत वाढतात, व सूक्ष्मदर्शक यंत्रांत तेव्हांच दिसतात. यूरोपमध्यें माद्या तपासण्याचें काम महिन्यानंतर सुरू करितात. याचें कारण ते बहुतकरून युरोपियन किडे पाळतात. युरोपियन किड्यांची अंडीं दहाव्या महिन्यांत फुटत असल्या कारणानें एक महिन्यानें सूक्ष्मदर्शक यंत्राचे कामास सुरुवात केली असतां चालते. आपले इकडील अंडीं नवव्या दहाव्या दिवशीच फुटतात. ह्मणून माद्या तपासण्याचें काम पांचवे किंवा सहावे दिवशीच सुरू करावें. अंडी फुटावयाचे आधीं तीं निरोगी किड्यांची असल्याबद्दल खात्री करण्याकरितां सूक्ष्म- दर्शक यंत्राचे साहाय्यानें तपासावी. फुलपाखरें निरोगी असल्यास सात आठ दिवस जगतात. त्या स्थितीमध्ये त्यांस खावयास कांहीं लागत नाहीं. जेथें अतिशय उजेड असेल व वारा वहात असेल, अशा ठिकाणीं सूक्ष्मदर्शक यंत्राचें काम करण्यास बसूं नये. साधारण उजेड असेल, अशा ठिकाणी काम करावयास बसले असतां चालेल. रात्रीच्या वेळीं दिव्यासमोर बसून यंत्रावर काम केलें असतां कांहीं वाईट नाहीं. एका कागदाच्या तुकड्यावर एका डबडीतील 'फुलपाखरूं काढून घ्यावें व त्यास चांगले रगडून चुरडावें. फुलपाखरू वाळले असल्यास स्वच्छ पाण्याचे दोन थेंब त्यांत घालून पाणी व फुलपांखराचा रद्दा चांगला चोळून चोळून एक जीव करावा. नंतर त्यांतील थोडा अंश कांचे-