पान:तुतीपासून रेशीम.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७० जावें, ह्मणून एक एका डबड्यांत एक एक मादी अंडी 'वालाययास सोडावी. आणि एवढ्याचकरितां डबड्यांचा उप- योग फायदेशीर होय. सूक्ष्मदर्शक यंत्र. जेथें सशास्त्र रीतीनें किडे पाळावयाचे असतील, तेथें यंत्र अवश्य असलेंच पाहिजे. यंत्र कसें असतें, हें अखेरीस दाखविलेंच आहे. त्यापैकीं अ ही बैठक; व ही यंत्राची नळी बसवावयाची जागा; कव न ह्या दर्शक कांचा; प, स, त ह्या वस्तु मोठ्या दर्शविणाऱ्या कांचा; ड हा यंत्रांत उजेड पाडणारा आरसा; ए ही प, स त या कांचा आड- कवण्याची नळी; व द ही क, न काचा बसवावयाची नळी. इतके भाग प्राय: वरील यंत्रामध्ये असतात. सूक्ष्मदर्शक यंत्रानें माद्यांची तपासणी करण्यास ज्या वेळीं बसावयाचें असेल, त्या वेळीं कागदाच्या चिटोऱ्या, व त्या टाकण्यास टोपली, काचा, मोरचुदाचें पाणी असलेले भांडें, पेनसिल, स्वच्छ पाण्याची वाटी, व सूक्ष्मदर्शक यंत्र, इतकें सामान लागतें. तपासण्याचें काम टेबलावर यंत्र ठेवून अथवा जमिनीवर बसून करतात. पैकीं जमिनीवर बसून तपास- णीचें काम जसें हिंदुस्थानांत करितात, तसेंच करणें बरें. वाजूस दिलेली यंत्रे मॅकमिलन आणि कंपनी, कलकत्ता, अथवा सेरीकल्चर डिपार्टमेंट, बंगाल, याचे सुपरिंटेंडेंट, यांजकडे मिळतील. जितकें शक्य असेल, तितकें किडे तपा-