पान:तुतीपासून रेशीम.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६९ ते एका पिढीतून दुसऱ्या पिढींतही जातात. ह्मणून फुलपांखरें जर रोगट असली, तर त्यांचेपासून पुढील पिढीस रोगाचें भय असतें. मादी जर रोगट असेल, तर तिच्या अंड्यां- पासून झालेले किडे मात्र रोगट होतात. ह्मणजे, मादीच्या अंगांतील रोग पुढील पिढीस जडतो. ह्मणून फक्त मादी सूक्ष्मदर्शक यंत्रानें तपासली ह्मणजे झालें. जी मादी रोगट अंडी घालते, तिच्या अंड्यांनी व्यापलेला तेवढा कागद कापून टाकावा. पत्र्या अथवा डब्या. फुलपांखरांनी अंडी इकडे तिकडे घालूं नयेत, याकरितां पत्र्याचा उपयोग करितात. दीड इंच उंच असून दोन्ही बाजूंस झांकणें नसलेल्या डब्या या कामी उपयोगीं आणाव्या. त्यांचा व्यास दीड इंचाचा असला ह्मणजे पुरे. ह्या डब्या दिनाचे गुळगुळीत पत्र्याच्या कराव्या. ह्मणजे फुलपांखरें त्या डबड्यांतून बाहेर न जातां आंतच राहतील. कित्येक ठिकाणी मातीच्या वेटोळ्याचा उपयोग करितात, व कित्येक ठिकाणीं कांचेच्या नळ्यांच्या ग्लासाचा उपयोग करितात. पैकीं एकास फुटण्याचें भय असतें, व दुसरें किंमतचेिं असल्यानें प्रायः निरुपयोगीच असतें. एका डबींत अंडीं घालण्याकरतां एक मादी सोडावी. सूक्ष्मदर्शक यंत्रानें माद्या तपासल्यावर जर मादी रोगट आढळेल, तर तिचीं अंडीं ज्या डबड्यांत असतात, तेवढीं काढून टाकावयास सुलभ