पान:तुतीपासून रेशीम.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६८ ४. जे किडे पाला घातल्याबरोबर आधाशासारखे झपा- ट्यानें खाऊन टाकतात; ५. जे कोसले मोठे असतात व ज्यांस घाण येत नाहीं; ६. ज्यांचीं फुलपांखरें मरतुकडी न दिसतां जोरदार दिसतात; . ७. ज्या किड्यांची अंडी कागदावर चांगल्या रीतीनें चिक- टलेलीं असतात, व त्यावरून हात फिरविला असतां सहज सुटी होत नाहींत ; ८. जे किडे कागदावर गोलाकृति एकाला एक लागून अंडी घालतात, व ज्यांच्या अंड्यांचे पुंजकेच्या पुंजके घातलेले नसतात. अशा रीतीच्या किड्यांची अंडी ते लोक घेतात. तरी पण इतकेंही करून तीं अंडी अगदीं निर्दोष अस- तात, असें कोणी समजूं नये. परंतु जेथें सूक्ष्मदर्शक यंत्राचे साहाय्याने किडे तपासणें शक्य नसतें, अशा ठिकाणीं वर नमूद केलेल्या गोष्टींवर विशेष भर द्यावा. अगदीं निर्दोष बीं पाहिजे असेल, तर ज्या माद्यांनी अंडी घातली असतील, त्यांस सूक्ष्मदर्शक यंत्राने तपासल्याखेरीज तीं शुद्ध आहेत, असें समजूं नये. पण सूक्ष्मदर्शक यंत्रांत रोगट जंतुन दिसल्यास ती अंडी अतिशय चांगलीं आहेत, असें मान- ण्यास हरकत नाहीं. अशा अंड्यांपासून पाळलेल्या किड्यांचे जातीस रोगाचें भय नसतें; इतकेंच नव्हे, पण त्यांचें पीक खात्रीनें घेतां येतेंः किड्यांस होणारे रोग सांसर्गिक असून