पान:तुतीपासून रेशीम.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६७ अंडीं एक शेर कोसले तयार करण्यास पुरी होतात. पण हें प्रमाण कांहीं ठीक नव्हे. कारण, किडे पिकूं लागे पावेतों कांही किडे मरतात, कांहीं अंडी फुटतच नाहींत, कांहीं लहान असतांना पाल्यांत जातात, व कांहीं किडे पिकल्यावर चंद- रक्यांतून पांखरे घेऊन जातात. ह्मणून अंडी मागवितांना वर दिलेले प्रमाण कांहीं ठीक नव्हे. करितां एक शेर कोसले तयार करतील इतक्या किड्यांची अंडीं मागविणें असल्यास युरोपियन तीन किड्यांचीं, निस्तरी आठ किड्यांचीं, व छोटे दहा किड्यांची अंडीं मागविणें वरें. अवांतर ठिकाणी पाला मिळणे शक्य असेल, तर रास्त सरासरीचे रीतीनेंच अंडीं . मागविणें बरें. जितके खात्रीचें बीं असेल, तितकी पिकाविषयीं खात्री असते. किड्यांची अंडी आसपास विकत मिळत अस- तील, व अशा ठिकाणी अंडी खरेदी करावयाची असतील, तर आपण जातीनें पाहून अंडी खरेदी करावीं. ह्मणजे, तेथील किडे कसे आहेत हें स्वतः पाहून त्यापासून झालेली अंडी घ्यावीत... कांहीं धंदेवाईक लोक बिजाकरतां अंडीं अथवा कोसले विकत घेतांना पुढील नियमाने पारख करितात. १. जे किडे पिकावयास आले असतांना हातावर अथवा दुसरीकडे पाठीवर उताणे टाकल्याबरोबर चटदिशीं पुन्हां पुर्ववत् होतात; २. जे किडे तोंडांतून झपाट्यानें तंतु काढून कोसला. करावयाचे काम तद्वत्च झपाट्याने करतात; ३. जे किडे मोठे दिसतात व तेजःपुंज दिसतात;