पान:तुतीपासून रेशीम.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६६ त्याच्या चौपट कोसले मागवावे. आपणास जितके कोसले तयार करावयाचे असतील, त्या मानानें थोडे अधिक अथवा कमी कोसले अथवा अंडीं मागवावी. आपणापाशीं जितका पाला असेल, त्यापेक्षां विकत देखील पाला मिळण्याचा कोठें संभव नसेल, तर अशा ठिकाणी अंदाजापेक्षां कांहीं कमी अंडी मागवावीं. नाहींतर अखेरीस पाला कमी पडतो, व सर्व मेहनत व्यर्थ जाते. जेथें दुसरीकडे पाला लागेल तितका मिळणें शक्य आहे अशी आपल्याला खात्री असेल, अशा ठिकाणी वाजवीपेक्षा जास्त किडे मागविल्यास हरकत नाहीं. पण जेथें पाला मिळण्याचा संभव नाहीं, अशा ठिकाणी आपल्या- पाशीं थोडा पाला शिल्लक राहील अशा रीतीनें अंडी माग- वावी. ह्मणजे पाला न मिळाल्यास पिकाचा नास होणार नाहीं. नाफे चांगले असतील व ज्या वेळीं कोसले ताजे असतील, त्या वेळी एका शेरांत बाराशे कोसल्यांपेक्षां जास्ती कोसले मावत नाहींत. जसजसे कोसले वाळत जातात, ह्मणजे त्याचे आंतील समाधिस्थ किडा अथवा धुला वाळून जातो, तसतसे एका शेरांत तीन हजार पावेतों कोसले मावूं शकतात. ह्मणून तौला ऐवजीं बाराशें कोसल्यांचा एक शेर धरतात. युरोपियन व बडे किड्यांचे आठशे किंवा नऊशें कोसले एक शेरांत मावतात. कारण ते दिढीने मोठे अस- तात. युरोपियन अथवा बड्या जातीच्या दोन फुलपाख रांनीं घातलेली अंडी, निस्तरी जातीच्या पांच किड्यांनी घातलेली अंडी व छोटे जातीच्या सहा किड्यांनी घातलेलीं