पान:तुतीपासून रेशीम.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६५ तरी चिकटवितात. किड्यांची अंडी खसखशी इतकीं बारीक असतात. युरोपियन व बडे किड्यांची अंडी सुटीं असतात, व निस्तरी वगैरे किड्यांची अंडी चिकटविलेली असतात. परक्या ठिकाणाहून वीं मागविल्यास नांवाजलेल्या बीं विकणारापासून मागवावें. कोसले तयार झाल्यावर, ह्मणजे किडे कोसले तयार करूं लागल्यापासून हवामानाप्रमाणें नऊ ते बारा दिवसांनी, कोसल्यास भोंक पाडून येतात; ह्मणजे, रूपांतर होऊन ते बाहेर पडतात. तेव्हां त्यांस फुलपांखरें ह्मणतात. ज्या दिवशीं तीं फुलपांखरें बाहेर पडतात, त्याच दिवशी त्यांचा संयोग होऊन मग सायं- काळचे सुमारास त्यांच्यांतील माद्या अंडी घालूं लागतात. एक मादी तीनशे ते चारशे पावेतों अंडी घालते. यूरोप- मधील देशांतून जीं अंडी पाठवितात, ती बहुतेक रोगट असतात. तिकडचे बी पाठविणारे रोगट व चांगल्या किड्यांचें वीं सरसकट विकतात, असें वाटतें. मी तीन चार वेळ बीं आणविलें, तेव्हां प्रत्येक वेळेस त्यांनी पाठविलेल्या किड्यांस काजळ्या व प्लेग हे रोग झालेले आढळून आले. पण त्याच किड्यांपासून शास्त्रीय रीतीने घेतलेल्या बियांचे किड्यांत हे दोन्ही रोग आढळले नाहींत. यावरून हैं निर्विवाद सिद्ध होतें कीं, ते सचोटीनें वीं पाठवीत नसावे. जर आपणांस वी मागवावयाचें, असेल. व तें चार पांच दिवसांचे ठिकाणावर असेल, तर तेथून बियांचे ऐवजीं कोसलेच मागवावे. आप- णांस जितक्या किड्यांची अंडी मागवावयाची असतील,