पान:तुतीपासून रेशीम.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हून उत्तम जाती शोधण्याचे व यामध्ये सुधारणा कर- ण्याचे प्रयत्न चालूच आहेत. तुतीच्या पाल्यावर पाळल्या जाणाऱ्या रेशमाच्या किड्यांच्या जाती आजकाल पांचच प्रसिद्ध आहेत, असें झटले असतां विशेष वाघ येणार नाहीं. त्या जाती युरोपी किडे, वडे किडे, निस्तरी किडे, छोटे किंडे व चिना किडे, या नांवांनी ओळखल्या जातात. व ह्या जातींच्या किड्यांस आजकाल पाळणारे लोक हिंदुस्थानांत बरेच आहेत. पैकीं कांहीं जातींचे किडे सालां- तून एकच वेळ रेशीम घालतात, ह्मणजे नैसर्गिक रीतीने एकच वेळ रेशीम देतात. व कांहीं जातींचे किडे सालांतून सात आठ वेळ रेशीम देतात. ह्मणजे फुलपाखरांनीं अंडीं घातल्यापासून त्यांची फिरून फुलपाखरें होईपर्यंत कांहींस एक वर्ष लागतें, व कांहींस चाळीस दिवस पुरे होतात. किड्यां- पासून फुलपाखरें, त्यांपासून अंडी, अंड्यापासून फुलपांखरें व फुलपाखरांपासून किडे, याप्रमाणे या किड्यांचा आयुष्यक्रम असतो. तुतीच्या पाल्यावर हल्लीं पाळल्या जाणाऱ्या किड्यांचा रंग पट्या पट्याचा, पांढराकाळा, ठिपक्याचा पांढरा, तांबड्या ठिपक्याचा पांढरा, व पांढरा, असा असतो. साधा- रणतः पांढरे किडे आळीसारखे दिसतात. पण तिच्यापेक्षां आकाराने चाळीसपट मोठे असतात. आळीचें तोंड वारनीस दिलेल्या लांकडाप्रमाणें तांबूस असतें. पण रेशमाच्या किड्याचें तोंड सफेतच असतें. सुर्चंट बिनकेसाचा पांढरा असल्यास जसा दिसेल, तसाच रेशमाचा किडा दिसतो. काळ्या पांढऱ्या