पान:तुतीपासून रेशीम.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६४ त्याही मोरचुदाच्या पाण्यानें शुद्ध कराव्या. तसेंच, जाळ करून चंदरकी त्यावरून फिरवली असतां जळू नये अशा रीतीनें चंदरकी जाळामधून फिरवावी. ह्मणजे जर कांहीं जंतु त्यावर असतील, तर ते सर्व जळून जातील. तसेंच, कोसले काढून घेतल्यावर वर कांहीं रेशमाचे तंतु शिल्लक राहिले असतील, तर तेही जळून चंदरकी स्वच्छ होईल. इतकें सर्व कृत्य झाल्यावर चंदरक्या सांठविण्याच्या जागीं नेऊन ठेवाव्या. चंदरकीस पट्टी शिवतांना तिच्या कडेस जाळीची पट्टी न वापरतां विनजाळीची वापरावी. असें केल्यास कडेच्या बाजूच्या पट्टी बाहेर किडे जाऊं शकणार नाहींत. किडे घालून चंदरकी उभी केल्यावर जर कांहीं किडे खालीं पडतील, तर ते वेंचून पुन्हा चंदरकींत टाकावे. एकदां त्यांनी तोंडांनी तंतु काढण्यास सुरुवात केल्यावर मग किडे खाली पडण्याचें भय नसतें. एका चंदरकींत तीन शेर कोसले तयार होतील, इतके किडे टाकावे. ह्मणजे, इतके कोसले तयार करणारे किडे ठेवण्यास एक चंदरकी लागते. जर किडे लागोपाठ चार पांच दिवस पिकत अस- तील, तर दुसरे दिवशी चंदरक्यांतील कोसले काढून घेऊन तिसरे दिवशी पुन्हां तींत किडे घालण्यास हरकत नाहीं. बीं किंवा अंडीं. किड्यांची अंडीं हेंच त्यांचें वीं होय. कांहीं जातीचे किडे सुटी अंडी घालतात, व कांहीं आपली अंडी कशाला