पान:तुतीपासून रेशीम.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६३ सुकी असल्याने किडा तोंडांतून तंतु काढतो न काढतो, तोंच तंतु बराच वाळतो. हवा ओलसर असल्या कारणानें जर तो तंतु ताबडतोब वाळणार नाहीं, तर त्यास लागलेला किड्यांच्या लाळेचा चिकट भाग तसाच ओला राहतो, व त्या योगानें तो तंतु त्याच तंतूच्या दुसन्या भागास पूर्ण चिक- टला जातो. अशा ओलसर हवेंत तयार झालेले कोसले बहुतेक निरुपयोगी होतात. कारण असल्या कोसल्यांची सलंग तार काढण्यास फार त्रास पडतो. घराबाहेरील अथवा घरांतील हवा जर ओलसर असेल, व अशा वेळीं जर किडे पिक- तील, तर घराची दारे खिडक्या वगैरे बंद कराव्या; ह्मणजे चाहेरील हवेचा परिणाम घरांतील हवेवर बिलकूल होणार नाहीं. अशा रीतीने घराची सर्व दारे बंद करून त्यांत पिकलेले किडे घातलेल्या चंद्ररक्या ठेवाव्या. चुन्याच्या भाजलेल्या कळ्यांचा नैसर्गिक गुण हवेंतील ओलावा शोषून घेण्याचा असतो. वराची दारे बंद केल्यावर किड्यांच्या घरांत ठेवलेल्या चुन्याच्या पेट्यांची दारे उघडावीं, ह्मणजे घरांतील हवा ताबडतोब मुकी होईल. तसेंच, घरांत उष्णता वाढून हवा चंदरक्या ठेवण्याच्या लायक होईल. हा प्रयोग घरांतील हवेचें मान ६० डिग्रीच्या वर ज्या वेळेस असेल, त्या वेळेस करूं नये. तट्यावर पट्टी शिवावयाचे आधीं मुप- लीस व पट्टीस डांबर लावल्यास त्यास बारीक भूगरी कीड लागणार नाहीं. व त्या एक वेळ केल्या असतां वीस वर्षे टिक- तात. चंदरकीमधून एकदां कोसले काढून घेतल्यावर