पान:तुतीपासून रेशीम.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६२ पर्यंत ठेवावा. ह्मणजे तींत किडे हगल्यास त्यांची लीद जमिनीवर पडेल. किड्यांची नैसर्गिक चाल वर जाण्याची असते. चंदरकीचें तोंड खालीं तिरपे केल्यास किडे आपो- आप वर जाऊं लागतात, व त्या योगानें त्यांची तोंडें तट्टीचे बाजूस होऊन पाठीमागला भाग जमिनीकडे होतो. चंद- रकींत किडे हगल्यास त्यांची लीद तट्टी वरप्रमाणें उलटी तिरपी ठेवल्यानें खालीं पडून स्वच्छ कोसले तयार होतात. ह्मणजे, त्यांना लीद वगैरे लागलेली नसते, व त्यामुळे त्यांत कचरा होत नाहीं. किडे सकाळचे सहा पासून आठ वाजे- तों पिकत असतात. किड्यांनी तोंडांतून तारा काढू लाग- ण्याचे आंत सर्व पिकलेले किडे वेंचून चंदरकींत टाकले. पाहिजेत. नाहीं तर वेंची पावेतों बरेंच रेशीम वाया जातें.. चंदरकींत किडे टाकल्यावर दहा वीस मिनिटें पर्यंत चंद- रकीचें तोंड उन्हाकडे करून ठेवावें. पण उन्हाचीं सरळ किरणें त्यांवर पडतील, अशा रीतीनें मात्र ठेवू नये. किड्यांस थोडीशी उष्णता लागल्यास ते आपल्या तोंडांतून तंतु लवकर काढून कोसले करावयाचें काम झपाट्याने सुरू करतात. नंतर दहा वीस मिनिटांनी चंदरकी सावलीत नेऊन ठेवावी. बराच वेळ चंदरकी उन्हांत ठेवल्यास किडे मरून जातात. सुक्या हवेंत किड्यांनी तयार केलेले कोसले चांगल्या रीतीनें उकलले जातात. किडे आपल्याकरतां घर करण्यास ज्या वेळ तोंडांतून तंतु काढीत असतात, त्या वेळीं तो तोंडांतून नुकताच निघाल्या कारणानें ओला असतो. त्या वेळी हवा