पान:तुतीपासून रेशीम.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६१ ह्मणून तिला वर सांगितल्याप्रमाणे डांबर किंवा तेल लाव- ण्याची हयगय करूं नये. चंदरकींत किडे टाकल्यापासून कोसले पूर्णपणे तयार करण्यास किड्यांस एक ते दोनच दिवस लागतात. किडा आपल्या भोंवती रेशमाचें कच्चें आवरण पांच तासांत तयार करितो. व आपणास जरी वरून पाहिल्यावर सर्व कोसला तयार झाला असें वाटतें, तरी दोन तीन दिवस तंतु काढून कोसला तयार करण्याचें आंतील किड्यांचे काम त्यांत चालू असतेंच. चंदरकी- मधून तिसरे दिवशी नाफे काढून घ्यावे. चंदरक्यांचे ऐवजी कोठें कोठें बारीक बारीक दाट फांद्यांचा उपयोग करितात. तसेंच कागदाच्या चिटोऱ्यांचा देखील कोठें उपयोग करितात. आपणापाशीं जितक्या तट्या आहेत, तितक्याच चंदरम्या हमेषा तयार ठेवाव्या. एखादे वेळीं चंदरक्या कमी पडल्यास झाडाच्या फांद्या जमिनीवर पसरून त्यांत किडे ठेवावे. फांद्या जमिनीवर पसरल्यावर त्यांत सोडलेल्या किड्यांस मुंग्यांपासून नुकसान होऊ नये, ह्मणून त्यांच्या सभोवार राख पसरावी. एकंदरीत सारांश असा कीं, किड्यांपर्यंत मुंग्यांचा प्रवेश होऊं नये, अशाविषयी जास्त खबरदारी ठेवावी. पण ह्या योगानें जागा बरीच अडवली जाऊन खर्चही जास्त लागतो. व त्यांतून कोसले बेंचून काढाव यास मेहनतही फार लागते. करितां हमेषा चंदरच्या तयार असणें विशेष चांगलें. चंदरकीवर किडे पिकल्यावर चंदर- कीचा जाळीचा भाग जरा जमिनीकडे वळवून अर्धा तास- ६