पान:तुतीपासून रेशीम.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६० किंवा चटई तयार करावयास ज्या लहान पठ्यांचा उपयोगं करितात, तसली पट्टी देखील चालते. पण ही पट्टी जाळीची असावी. जाळीचें भोंक निदान पावलीच्या आकाराचें असावें. या प्रत्येक भोंकामध्यें पात्र इंचा इतकें अंतर असावें. ह्मणजे, त्यांत किडे टाकले असतां त्यांस इकडे तिकडे त्यांतून सहज जातां यावें. नंतर ती पट्टी तव्यावर दोन दोन इंचांवर वर्तुलाकार शिवावी, ह्मणजे त्याचा आकार कागदा- वर घड्याळाची स्प्रिंग ठेवल्यासारखा होईल. चंदरकीकरतां पट्टी शिवण्यास जी तट्टी घ्यावयाची, ती चार सहा फूट लांबी रुंदीची असावी. तट्टीच्या मागें व चोहों बाजूंस बांबूच्या कांबी बांधाव्यात. ह्मणजे तट्टी उभी केल्यास ती बिलकूल लवणार नाहीं. प्रत्येक तट्टीस रुंदीच्या बाजूस पाय ठेवावे. ह्मणजे चंदरकी उभी करून मागून काठीचा टेंका दिल्यास ती त्या पायांवर उभी राहील. पिकलेले किडे चंदरकींत चोंहों बाजूंस सारखे टाकल्यावर ती उभी करून ठेवावी. बाजूचे आकृतीचे चित्रांत दाखविल्याप्रमाणें चंद- रकी उभी करावी. तिचे पायांस दोन बोटें डांवर अथवा बिब्याचें तेल लावावें, व मागें टेंका दिलेल्या काठीसही दोन बोटें तेल लावावें. ह्मणजे त्यावर मुंग्या चढूं शकणार नाहींत. मुंगी एकदां किड्यास चावल्यास तो कोसला तयार करूं शकत नाहीं. रेशमाच्या कोसल्यास भोंक पाडून मुंगी आंत जाते व किडे खाते. भोंक पाडलेल्या नाफ्यापासून चांगलें. रेशीम काढतां येत नाहीं. मुंग्या चंदरकीवर चढू नयेत,