पान:तुतीपासून रेशीम.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५९ संवय झालेला मनुष्य एका तासांत दहा शेर पाला केसा - सारखा बारीक कापूं शकतो. जेथें पहिल्याच दिवशीं रोजीना दर वेळ पंचवीस तीस शेर पाला किड्यांस खावयास कापून घालावा लागतो, तेथें यंत्रानें काम केलेलें बरें. सुरीचें अथवा यंत्राचें काम किडे अंड्यांतून फुटल्यापासून दहा बारा दिव सच लागतें. किड्यांनीं दोन वेळ कात टाकल्यानंतर त्यांस लहान लहान डाहळ्या खाण्याकरितां त्यांवर टाकल्या, तरी हरकत नाहीं. ते पानें खाऊन काड्या तशाच ठेवा. चंद्ररक्या. सुपल्यांतील किडे पिकले, ह्मणजे त्यांचा रंग तांबूस होऊन ते तोंडानें तंतु काढूं लागावयास योग्य झाले, ह्मणजे त्यांस तेथून काढून ताबडतोब चंद्ररक्यांमध्ये ठेवावे. जर ते सुपल्यांत तसेच राहतील, तर ते तेथेंच कोसले तयार करण्यास सुरवात करतील. सुपलींतच किड्यांनी 'कोसला तयार केला, तर कोसला बारीक व गुंतागुंतीचा होतो, व त्यापासून रेशीम काढण्यास त्रास पडतो, व ते कोसले मळकट होतात. चंदरकीमध्ये किड्यांनी कोसले तयार केल्यास ते चांगले स्वच्छ आणि मोठे होतात. एक एक चंदरकी सहा फूट लांब व चार फूट रुंदीची असते. चंदरकी तयार करावयाची असल्यास एक चार बोटें रुंदीची बाबूंची पट्टी विणून तयार करावी, व त्याची लांबी दोन अडीचशे गज असावी. शिंदीच्या पानाच्या बोया 1