पान:तुतीपासून रेशीम.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५८ च मेहनत वजा जातां फार तर एका एकरी पंधरा रुपयांचें उत्पन्न होत असतें. अशा ठिकाणीं जर तुतीचें जंगल तसल्या जमिनीच्या मालकांनी लावलें, तर त्यांस अपरिमित फायदा होईल. पहिल्यानें त्यांना थोडा खर्च येऊन दोन तीन वर्षे त्यांतून कांहीं उत्पन्न येणार नाहीं, हें खरें. पण मागाहून त्यांस कांहीं एक खर्च करावा न लागतां फक्त पाल्याचें उत्पन्न एकरी शंभर ते दीडशे रुपये होईल. पण जरी त्यांनी किडे न पाळतां त्यावर जनावरें पाळली, तरी देखील त्यांस मोठ्या प्रमाणांत फायदा होत जाईल. सुरी व ठोकळा. किडे अंड्यांतून ज्यावेळीं बाहेर पडतात, त्या वेळीं ते केसा सारखे बारीक असतात. अशा वेळीं त्यांस कोवळा पाला केसा इतका बारीक चिरून घालावा लागतो. किडे जस- जसे मोठे होत जातात, तसतसा पाला मोठमोठा चिरून घालावा लागतो. पाला चिरण्यास चांगली धारेची सुरी घेऊन एका लांकडावर हाताने पाल्याची गुंडाळी करून दाबावी, व दुसच्या हातानें सुरीनें पाला बारीक कापावा. बायका चिळीनें जशी भाजी चिरतात, त्याप्रमाणें बंगाल- मधील लोक पाला कापतात; पण त्यास मेहनत व वेळ जास्त लागतो. मैसूर व सीलोन प्रांती वर लिहिलेप्रमाणे सुरीनेंच पाला कापण्याचा प्रघात आहे. व हीच रीत सर्वांत बरी. युरोप खंडांत पाला कापण्याच्या यंत्रानें तो कापतात. चांगली