पान:तुतीपासून रेशीम.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५७ पाला जाड व मऊ, ह्मणजे किड्यांस उत्तम रीतीनें मानवेल, असा असतो. लाहोर वगैरे प्रांती अंधी येत असते, ह्मणजे वाऱ्याबरोबर धुळीचे रजःकण हवेंत एकसारखे मिसळलेले असतात. असा वारा चोहोंकडे पसरल्यानें धुक्यानें जशी वातावरणाची दशा होत असते, तशी धुळीनें होत असते. वातावरण धूलिमय झाल्यानें, ह्मणजे हवेंत चोहोंकडे एक सारखी धूळ पसरल्यानें, दिवसा देखील घरांत दिवे लाव- ण्याची पाळी येते. आपल्या इकडे वायधुळीनें जसा कांहीं भाग धुळीनें जमिनीपासून वर पावेतों व्यापला जातो, तशीच अंधीची स्थिति असते. फरक इतकाच की, वाय- धुळीनें हवा जोरानें चक्राकार फिरत असते, पण अंधीनें धुळीचा वारा एकसारखा वहात असतो, व त्यानें औरस चौरस दहा दहा मैलाचा देखील प्रदेश व्यापला जातो. असली अंधी तिकडील प्रदेशांत प्रायः दोन तीन दिव- सानीं उन्हाळ्यांत ठेवल्यासारखी असते. असल्या अंधीनें झाडांचे पानावर धूळ सांचते. धुळीने भरलेला पाला तसाच किड्यांस खावयास कधीं घालूं नये. नाहीं तर त्यांस काजळ्या रोग होण्याची भीति असते. ह्मणून अशा समयीं तो पाला चांगला झटकून नंतर किड्यांचे उपयोगांत घ्यावा. आमच्या इकडे ह्मणजे मुंबई इलाख्यांत सह्याद्रीचे पठारी- वर व उतरणीवर पुष्कळ ठिकाणीं जागा पडीत असलेली आढळून येते. व जेथें लागवडीखालीं जमीन असते, तींत देखलि प्रायः नाचणी वरी सारखीं तृणधान्यें लावली जातात.