पान:तुतीपासून रेशीम.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५६ जंगलेंच्या जंगलें आढळण्यांत येतात. लाहोरास नदीच्या किनाऱ्यावर, तसेंच पंजात्रांत बऱ्याच प्रातांत तुतीचीं लहान लहान रानें आढळून येतात. अशा ठिकाणी रेशमाचे किडे पाळण्यास जर कोणी मुरवात करील, तर त्यास अपरिमित फायदा होईल. पैकीं काश्मीरमध्ये रेशमाचे किडे पाळण्याचें काम बरेच चालत आहे. पण लाहोरच्या आसपास व मध्यहिंदुस्थानांत रेशमाचे किडे पाळण्याचें काम अद्याप कोणी केलेले दिसत नाहीं. अशा ठिकाणीं किडे पाळून जर कोणी धंदा करूं लागेल, तर त्यास बराच फायदा होऊ • लागेल. कित्येकांचा असा समज आहे कीं, तेथील उन्हा- ळ्याचे प्रखर उष्णतेंत किडे पाळण्याचें काम होणें कठिण आहे. ह्मणजे तसल्या ठिकाणीं किडे जिवंत राहू शकणार नाहीत, असे कित्येकांचें मत आहे. पण गेल्या मे महिन्यांत मी तेथें किडे पाळून पाहिले. त्यावरून माझी खात्री आहे कीं, थोडी काळजी घेऊन काम केलें, तर तेथें व्यापारी दृष्टीने किडे पाळणें कांहीं कठिण नाहीं. जेथें तुतीचा पाला विपुल आहे, अशा ठिकाणी पाल्याकरितां फारच थोडा खर्च लागतो. व अशा ठिकाणी किडे पाळल्यापासून अपरि- मित फायदा होऊ शकेल. किड्यांस जो पाला लागतो, तो रोज सारख्या प्रमाणांत लागत नाहीं. ह्मणजे, त्याचें लागण्याचें मान वाढत्या प्रमाणांत असतें. साध्या लागवडीचे झाडापासून मिळणाऱ्या पाल्यापेक्षां पेंवदीच्या झाडाचा पाला किड्यांस फार चांगला मानवतो. ह्मणजे, पेंवदीच्या झाडाचा