पान:तुतीपासून रेशीम.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५५ हें पाहूं. झाडें जर पूर्ण वाढलेलीं असतील, तर प्रत्येक झाडापासून खोड्यास दीड ते दोन मण पावेतों पाला मिळू शकतो. झाड तीन वर्षाचें असल्यास व त्याची जोपासना केल्यास दर पद्धतशीर छाटणी करून चांगली खोड्यास सहा शेर पावेतों पाला मिळू शकतो. चार वर्षाचें अस- ल्यास दर खोड्यास दहा शेर, सहा वर्षाचें असल्यास पंधरा तेवीस शेर, व दहा वर्षाचें असल्यास एक मण देखील पाला मिळू शकतो. कांहीं दिवस किडे पाळीत गेल्यास हा अनु- भव प्रत्येकास आपोआप येतो. आतां याप्रमाणें लागवड करून आपणापाशीं ज्या मानानें पाला असेल, ह्मणजे आपणांस लागवडींतून जितका पाला मिळू शकेल, त्याप्रमाणें मणीं दोन शेर कोसले तयार होतील. याप्रमाणें अवांतर साहिल तयार ठेवून त्यावर किडे पाळ- ण्यास सुरू करावे. जमिनीची जितकी चांगली मशागत करावी व त्यांत लागल्या जाणान्या झाडांची जितकी जोपासना करावी, तितका त्या झाडांपासून पुष्कळ व चांगला पाला मिळू शकेल. पानें रसभरीत व मऊ लुसलुशित असून चिवट नसावींत व तीं जाड असावीत, असें वाटत असल्यास झाडांची योग्य काळजी घेतलीच पाहिजे. पानें रसभरीत व जाड असल्यास त्यांवर किडे फार चांगले तयार होतात, ह्मणजे असला पाला किड्यांस चांगला मानवतो. आपल्या इकडे डोंगरांत जरी तुतीचीं जंगले आढळत नाहींत, तरी हिमालयांत व मध्य हिंदुस्थानांत तुतीचीं