पान:तुतीपासून रेशीम.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५४ करावा. मोठ्या प्रमाणावर झाडें लावून त्यांस चार वर्षांची तयार करण्यास प्रत्येक झाडास अजमासें तीन ते चार आणे खर्च येतो. खर्चाचा खर्डा तयार करणें हा एक कागदी खर्च आहे, असें ह्मटल्यास हरकत नाहीं. तरी पण झाडें एकदम कायमच चोबसि फुटावर लावल्यास या प्रमाणानें दहा हजार झाडें तयार करण्यास दर झाडास तीन ते साडे तीन आण्यांपेक्षां जास्त खर्च येणार नाहीं. कित्येक ठिकाणीं खत स्वस्त असतें, तर कित्येक ठिकाणी मजुरी कमी असते. सारांश, कसेंही झालें तरी वर दाखविल्यापेक्षां जास्त खर्च न येतां कमीच खर्च येईल. लागवडीमध्यें पाला किती आहे व त्यापासून पाला किती मिळेल, हें फक्त पुस्तक वाचून सम- जणें अशक्य आहे. तरी पण पुस्तकाचे योगानें त्याची थोडी बहुत कल्पना येऊ शकेल. अनुभवाचे योगानें शेतांत अथवा झाडावर पाला किती मिळेल, व त्यावर किती छाटणीचे पाल्यावर पाळतां येतील, हें सहज समजते. बंगाली लागवड एक फुट उंचीची असून चांगली जोरदार असेल, तर एक एकरापासून चौवीस मण पाला दर खोड्यास मिळू शकतो. सर्व झाडें सारखीं दोन फुट उंचीची असल्यास वेळेस, ह्मणजे खोड्यास, चाळीस मण पाला मिळू शकतो. लागवड जर चांगली जोराची असेल, व जर ती माणसाच्या उंची बरोबर वाढली, तर एका एकरापासून खोड्यास नव्वद मणही पाला मिळू शकतो. पण इतक्या वाढीस निदान दोन महिने तरी लागतात. आतां झाडावर किती पाला मिळतो,