पान:तुतीपासून रेशीम.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५३ फुटाच्या अंतरावर एक एक याप्रमाणें एक एकरांत ४४, १०० झाडें तयार करण्यास ३५० रुपये खर्च लागतो. लावलेलीं सर्व झाडें येतातच, असें नाहीं. त्यांपैकीं कांहीं मरतात व कांहीं खुरटी होतात. सारांश, त्यांपैकीं निमी जरी गेलीं, तरी २२,००० झाडें तयार होण्यास हरकत नाहीं. जर आपणास १०,००० झाडे लावणें असेल, तर आपण एक एकराची रोपड्यांकरितां लागवड करावी. नंतर फुटा फुटाचे अंतरा वर झाडांची लागवड करण्यास जमिनींत औरस चौरस खड्डे करण्यापेक्षां सर्व जमिनीची एक फूट खोलीची नांगरट करून व सर्व जमिनीची मशागत बंगाली लागवडीप्रमाणें करून लागण करावी. आतां आपण त्याचे खर्चाकडे वळू. झाडें तयार करण्यास व तीं वर्षभर पाळण्यास. पंचवीस एकर जमीन तयार करण्यास दर एकरास ५० रुपये प्रमाणें. झाडें तीन तीन फुटावर बदलून लावण्यास. एक वर्षभर पाणी देण्यास. सर्व झाडांस खत. सहा माळ्यांचा पगार दर महा सहा किंवा सात रुपये प्रमाणे. ३५० १,२५० ५०० ६०० ५०० ४,२०० जर तिसरे सालींच कारखाना चालविण्यास आपलेपाशीं विपुल पाला असावा अशी इच्छा असेल, तर वरप्रमाणें खर्च