पान:तुतीपासून रेशीम.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५१ होण्यास खर्च करून तीन चार वर्षे वाट पहावी लागते. पण पुढे मात्र कोणत्याहि प्रकारचा खर्च त्यांस करावा लागत नाहीं. पांच सहा महिन्यांचे आंत आपणास या धंद्यापासून काही मिळू लागेल, अशा विचाराने जर धंदा सुरू करणें असेल, तर बंगाली तऱ्हेची लागवड सुरू करावी. व जो इसम कांहीं दिवस वाट पाहूं शकेल, त्याने मोठ्या झाडांची लागवड करावी. एक एकराचे लागवडीस लागणारा साधारण खर्च येणेंप्रमाणे:- बारा बैलांची नांगरट, दीड दिवस, आडवी उभी एक वेळ दर जोडीस १ रु. प्रमाणें ६ जोड्यांस चार बैली नांगर, चार दिवस रोज रुपया जोडीप्रमाणें दोन वेळ नांगरण्यास. २० गाड्या शेणकीची किंमत, दर गाडीस एक रुपया प्रमाणें. राख २० गाड्या, दर गाडीस १ रुपयाप्रमाणें. खत आणून पसरण्याची मजूरी. दोन वेळ चार बैलांची नांगरट दोन दिवस. चारा कुळवाच्या पाळ्या दररोज तीन पाळ्या प्रमाणें रोज रुपया सभोवती एक हात रुंदीचा व एक हात खोलीचा ६-०-० ८-०-० २०-०-० २०-०-० १०-०-० ४-०-० ४-०-० चर खणणें, १०० फुटास चार आणे प्रमाणें १०-०-० रोपें अथवा कलमांची किंमत. ४०-०-०