पान:तुतीपासून रेशीम.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५० मिळाल्यास महाग नाहींत. ज्यांची शेती अफाट आहे, व जे आपली जमीन शेतकऱ्यास कौलाने देतात, त्यांनी झाडें घरी तयार करून दर शेतकन्यास वीस पंचवीस झाडें बांधा- वर लावावयास दिल्यास त्यांस थोडेच दिवसांत विशेष खर्च न करतां ती एक मोठी उत्पन्नाची बाब होऊन बसेल. शेतकरीही आपले खोतास खूप राखण्याकरितां झाडें लावून त्यावर निगराणी करण्यास विशेष कांकूं करणार नाहींत. सारांश, या बाबतीत प्रत्येकानें थोडें फार आपले डोके खर्च केल्यास त्यास यापासून थोडी तरी प्राप्ति होईल. तुतीचा पाला गुरें फार आवडीने खातात, व त्यांस तो चांगला मानवतो. जरी कोणास या झाडावर रेशमाचे किडे पाळा - वयाचे नसतील, तरी बारमहा जनावरांकरितां त्यांपासून त्यांना निदान सालाच्या वैरणीची तरतूद होईल. आतां आपण सर्व लागवडीमध्ये विशेष श्रेयस्कर लागवड कोणती ह्याकडे वळू. जर कोणास आपले शंभर दोनशे रुपयांचे भांडवलावर धंदा करावयाचा असेल, व जर जमीन माल- कीची असेल, व तो जातीनें मेहनत करणारा असेल, तर बंगाली लागवड त्यास अत्यंत उपयोगी होईल. असा कोणताही शेतकरी आढळणार नाहीं कीं, जो झाडे लावून पहिल्यानें पैसे खर्च करून चार पांच वर्षे उत्पन्नाकरितां वाट पाहील. बंगाली लागवड केल्यापासून चवथे महिन्यांत पाला तयार होतो. व त्यास दरसाल लागवडी प्रीत्यर्थ खर्च करावा लागतो. कायमचीं - झाडे लावणारास त्यांचें उत्पन्न सुरू