पान:तुतीपासून रेशीम.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४९ शिल्लक असलेल्या डाहळ्यांस एकही पान राहूं देऊं नये. असे केल्याने झाडावर पाला फार लवकर येतो. व झाडही लवकर वाढतें. झाडें मोठीं झाल्यावर त्यांस खत देण्यापासून अथवा पाणी दिल्यापासून कांहीं विशेष फायदा होत नाहीं. फक्त सालांतून एक दोनदां झाडाखालचे जमिनीची नांग- रठी अथवा खणणी करावी. झाडाखाली फार गवत माजल्याने झाड जोरानें भरारत नाहीं. तसेंच त्यास जेथें वाळवी वाळवी लागण्याचाही संभव असतो. अतिशय लागते. तेथें झाडाच्या बुंध्यास सभोवती चार बोटांचा डांबराचा पट्टा देतात. डांबर लावल्यानें कोणतेही झाडास वाळवी चढत नाहीं. तसेंच मुंग्या वगैरे कीटकही चढत नाहींत. झाडाचे सावटीखालीं आलें व भुईमूग यांची लागवड केली असतां चालते. दरसाल आलें अथवा भुईमूग लावीत गेल्यास सालांतून जमिनीची दोन वेळ आपोआप खुदाई होऊन झाडाखालीं गवत वगैरे होण्याची भीति नसते. डांवर महाग असतें, ह्मणून आह्मी मागें लिहिलेलें बित्रा व तेल यांचें रोगण लावलें असतांतें डांबरा- पेक्षांही जास्त काम देतें. जेथें तुतीचीं झाडें रेशमाचे 'लागवडीकरितां लावण्याचा प्रघात आहे, तेथें शेतकऱ्यानें आह्मी सांगितल्याप्रमाणें झाडें तयार करून एक एक आण्यास विकल्यास खर्च वेंच जाऊन त्यास एकरी ३०० ते ३५० रुपये मिळण्यास हरकत नाहीं. व खरीद करणारा- सही असलीं चांगलीं झाडें एक एक आण्यास एक एक ५