पान:तुतीपासून रेशीम.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४८ खुडावीत व त्या रोपांवर ज्या फांद्या फुटल्या असतील, त्यांचे शेंडेही खुडावेत. ह्मणजे झाड लावणीलायक तयार होते. झाड लावतांना मुळें साफ पसरून लावावें. झाड जमिनींत लावण्याची तन्हा व त्या वेळीं त्याची असणारी स्थिति आकृति अ प्रमाणें असावी. मृगाचे मुमारास कायम जागीं झाड लावलें, ह्मणजे सहा महिन्यांनी एक वेळ याप्रमाणें सालांतून दोन वेळ त्याची छाटणी करावी. ह्मणजे प्रत्येक शेंडा असलेली फांदी तिच्या मध्यावर छाटावी. सुरवातीस फांद्यांच्या वर पाल्याचा बराच समुदाय असतो. त्यास तोलून धरण्या इतकी कांहीं झाडां- च्या बुंध्यांत ताकद नसते. व त्यामुळे ती झाडें लवतात. अशा वेळी झाडावरील प्रत्येक फांदीच्या अखेरीच्या दोन तीन पानांशिवाय सर्व पाने खुडावीत. पाने खुडीत गेल्यानें सर्व जोर पुढील वाढीस मिळाल्यानें तें वाढतें, व झाडावरील भार कमी झाल्यानें ती लवत नाहींत. इतकेंही करून झाड लवत असेल, तर त्यास काठीचा टेंका द्यावा, अथवा काठी पुरून झाड सरळ राहण्याकरितां तीस बांधावें. झाड लावून दोन वर्षे गेल्यावर त्याचा बुंधा जोरदार बनल्या- कारणाने टेंका वगैरे देण्याची जरूर रहात नाहीं. जसजसें झाड छाटीत जावें, तसतसें तें अधिक जोरानें वाढत जाते. प्रत्येक वेळच्या छाटणीचा पाला किडे पाळण्यास उपयोगास घेतां येतो. छाटणी करते वेळेस समांतर अंतराने डाळ्या राहतील अशा रीतीनें छाटणी करावी. प्रत्येक छाटणीस