पान:तुतीपासून रेशीम.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लावण्यालायक झाडे तयार करण्यास नरसरीची जमीन चांग- लीच पाहिजे. तरू तयार केल्यावर अथवा कलमें तोडून जमीन मागें सांगितल्याप्रमाणें तयार केल्यावर फुटाफुटावर एक एक याप्रमाणे ज्या मानानें आपणास झाडें पाहिजे अस- तील, त्या मानानें नरसरींत रोपांकरतां लागवड करावी... नरसरींत तीं रोपें मृगापावेतों, ह्मणजे पावसाळ्या पावेतों, सरळ वाढू द्यावी. कदाचित् त्यांस आजूबाजूस धुमारे फुटू लागतील, तर ते खुडून काढावे; ह्मणजे पांच फुटांपर्यंत निदान डाहळ्या फुटूं दऊं नयेत. मृगाचे सुमारास नरसरी- तून रोपे काढून जेथें झाडें कायम लावावयाची असतील, तेथें नेऊन लावावी. पांच ते सहा फूट उंचीची झाडें लागवडीलायक तयार होण्यास कलमें लावल्यापासून निदान सहा महिने तरी लागतात. मृगाचे सुमारास कलमें लावल्यास जानेवारचेि सुमारास पांच सहा फूट उंचीचे वृक्ष तयार होतात. त्या वेळेस सर्वांचे शेंडे खुडून काढावेत. ह्मणजे त्यांस शेंड्याजवळ अनेक धुमारे फुटून त्यांच्या फांद्या होऊं लागतात. पुढील मृगाचे सुमारास त्या फांद्यांची लांबी तीन चार फुटांची होते. ह्मणजे फांद्यांच्या उंचीसकट झाडाची उंची सात फुटांची होते. एवढी मात्र खबरदारी घेण्यास चुकुं नये कीं, निदान चार फुटाचे खाली फांदी फुटू देऊ नये.. धुमारे फुटल्यास खुडून टाकीत जावे. झाडें बदलून कायम जागी लावावयाकरितां नेतांना मुळासकट, मुळें न तुट- तील अशीं, खणून काढावी. नंतर त्या रोपड्यांची सर्व पानें 68