पान:तुतीपासून रेशीम.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४६ याप्रमाणें दोन तीन वर्षे करीत गेल्यास चार वर्षांत झाडें झुपकेदार होऊन एका झाडापासून निदान मणभर तरी पाला दरसाल मिळू शकेल. प्रत्येक झाडाची छाटणी वर्षांतून चार वेळ करतात. ह्मणजे दर छाटणीस एका झाडापासून चवथे वर्षी दहा शेर पाला मिळूं शकेल. पांचवे वर्षी बारा ते पंधरा, सहावे वर्षी पंधरा ते वीस, याप्रमाणें दहावे वर्षी एका झाडा- पासून दर छाटणीस एक एक मण पावेतों देखील पाला मिळू शकतो. झाडाची छाटणी वर्षांतून चार वेळां करतां येते. झाडें दाट झाली असे दिसून आलें, ह्मणजे मधील एक एक झाड छाटून काढावें. ह्मणजे नऊ नऊ फुटांवर एक एक याप्रमाणें होईल. आठवे अथवा नववे वर्षी, ह्मणजे ज्या वेळेस एक एक वृक्ष दर वर्षी मणभर पाला देऊ शकतो, त्या वेळेस, मधील एक एक वृक्षाची पुन्हा छाटणी करावी. ह्मणजे एकापासून दुसरा वृक्ष अठरा फुटांचे अंतरावर होईल. अशा रीतीनें वृक्ष मोठे करीत गेल्यास थोड्या जमिनीत आपल्यास पाहिजे तितका पाला चवथे वर्षापासून मिळू शकतो. ह्मणजे एक एकर जमिनींत जितका पाला दहा वर्षांच्या पूर्ण वाढीच्या झाडापासून मिळतो, तितका पाला चवथे सालापासून झाडें जवळ जवळ असल्या का- रणाने मिळतो. ह्मणजे विशेष खर्च न होतां आपला कार- खाना चवथे सालापासून कायम करतां येतो. झाडे लावण्यास माळाची, डोंगरकठडा, अथवा जी जमीन शेतकऱ्यांस उप- योगी पडत नाहीं, असली कोणतीही जमीन चालेल. परंतु