पान:तुतीपासून रेशीम.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४५ खर्चानें विपुल पाला मिळू शकतो. झाडांच्या लागवडीवर किडे पाळणारांस खर्च करून चार पांच वर्षे वाट पहावी लागते. पण पुढें त्यांस कांहीं एक खर्च करावा लागत नाहीं. व त्यांचा धंदा फार जोराने चालतो. झाडांच्या लागवडीचा पाला. मागें सांगितल्याप्रमाणें रोप तयार झाल्यावर त्यांस फुटा- फुटाचे अंतरावर एक एक याप्रमाणे लावावें. तेथें तीं झाडें पांच सहा फूट उंचीची झाल्यावर तेथून काढून तीन तीन फुटांचे अंतरावर औरस चौरस हाता हाताचे खड्डे करून त्या वड्यांत दोन भाग माती व एक भाग राख असें व शेणाचें खत घालून मृगाचे सुमारास तीं लावावीं. पावसाळ्यांत या झाडांस पाणी देण्याची जरूर नसते. पुढील मृगापर्यंत महिन्यांतून एकदां अथवा दोनदां पाणी दिलें, ह्मणजे पुढें झाडांस पाणी देण्याची गरज रहात नाहीं. फुटाफुटाचे अंतरावर झाडे लावून पांच सहा फूट उंचीची एकच सरळ काडी वाढू द्यावी, व तीस फांद्या फुटल्यास त्या छाटून काढाव्या. फांद्या खालीं फुटू न देण्याचें कारण जनावरें, शेळ्या, मेंढ्या वगैरेपासून झाडांची राखण करण्यास लागू नये, हें होय. सरळ पांच सहा फुटाची वाढ झाल्यावर त्यांचा शेंडा छाटून त्यांचीं सर्व पाने खुडून काढावीं, व पांच फुटाचे वर त्यांस धुमारे फुटं द्यावे. ते धुमारे दोन हात वाढले, ह्मणजे हातभर कायम ठेवून पुन्हा छाटणी करावी.