पान:तुतीपासून रेशीम.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४४ फारच फरक आहे. बंगाली तऱ्हेच्या लागवडीस सदोदित नजर ठेवावी लागून लागवड चांगल्या स्थितींत राहण्या- करितां सालांतून खत, खोदणी, भर, पाणी वगैरे कृत्यांकरतां दरसाल खर्च करावा लागतो. नाहीं तर लागवड निकामी होते. पण चिनी तऱ्हेच्या लागवडीनें बंगाली लागवडी- प्रमाणें पाला मिळून सालांतून दमडीचा देखील खर्च करावा लागत नाहीं. चिनी लागवड एक वेळ केली, ह्मणजे पन्नास वर्षे चांगल्या तऱ्हेने कामास येते. या लागवडीच्या पाल्याचा गुणधर्म मोठ्या झाडांच्या पाल्याच्या गुणधर्मासारखा असतो. बिलोरी रोग कचित् प्रसंगी बंगाली लागवडीच्या पाल्यावर पाळलेल्या किड्यांस होतो. पण झाडांवरील पाल्यावर पाळ- लेल्या किड्यांस बिलोरी बहुतेक होत नाहीं. छोटे किड्यांच्या जातीस बंगाली लागवडीचा व जपानी तुतीचा पाला चांगला मानवतो. मोठ्या झाडाच्या लागवडीचा पाला मोठे किडे, युरोपियन किडे व निस्तरी किडे, यांस चांगला मानवतो. जमिनींतील अवांतर पिकांस जोराने वाढण्यास लागणारी द्रव्ये जमिनीच्या वरील थरास आणून टाकण्यास तुतीच्या झाडांची मुळे कारणीभूत होतात. ह्मणजे ज्या जमि- नींत तुतीची झाडे लावलेली असतात, ती जमीन अतिशय सुपीक होते. मोठ्या झाडांच्या पाल्यावर किडे पाळल्यास पाल्याप्रीत्यर्थ सालोसाल करावा लागणारा खर्च करावा लागत नाहीं. ह्मणजे, झाडे लावून एकदां चार पांच वर्षे पावेतों खर्च व मेहनत केल्यावर पिढी दोन पिढ्या बिन-