पान:तुतीपासून रेशीम.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४३ नाहींसा होतो. सर्व ओलावा नाहींसा झाल्याखेरीज किडयांस पाला घालू नये. जितका पाला जाड असेल, तितका त्यांत सत्त्वांश जास्त असतो. बियापासून केलेल्या लागवडीचा पाला पातळ असतो, व कलमापासून केलेल्या लागवडीचा पाला त्याहून ज्यास्त जाड असतो. हा नियम सर्व झाडांच्या संबंधांत सारखा लागू आहे. चीन देशांत तुतींची लागवड फारच निराळ्या तऱ्हेने करतात. आपले इकडीलप्रमाणेंच रोपे तयार करून दोन दोन हातावर औरस चौरस एक फुटच्या खोलीचे खड्डे करतात. नंतर शेणाच्या व राखेच्या खतानें सदरहू खड्डे भरून त्यांत रोपे लावतात. नंतर त्या जागीं तीं झाडें पांच वर्षे तशींच वाढू देतात. पांच वर्षांत झाडांचा बुंधा मांड्यांइतका जाडीचा अथवा त्यापेक्षां मोठा सहज तयार होतो. चार पांच वर्षांचें झाड वाढले ह्मणजे झाडाचा हातभर उंचीचा बुंधा कायम ठेवून सर्व झाडें छाटून काढतात, व त्यामुळे त्या बुंध्यास महिन्या दोन महि- न्यांत चोहों बाजूनें जोरानें धुमारे फुटून ते चार पांच फुट उंचीचे होतात. याप्रमाणे सर्व झाडांची वाढ झाल्यावर सर्व धुमारे बीत दीड वीत राखून बाकीच्या फांद्या छाटून किडे पाळावयास घ्याव्या. नंतर पुन्हां महिन्या दीड महिन्यानें पाला फुटल्यावर वीत दीड वितीच्या फांद्यांवर फुटलेले धुमारे बंगाली लागवडीप्रमाणें फांद्यांवरील धुमाऱ्यांचे तळापासून छाटून घेतात. ही लागवड साधारण बंगाली लागवडी- प्रमाणेंच दिसते. पण ह्याचे व बंगाली लागवडीचे गुणधर्मांत