पान:तुतीपासून रेशीम.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४२ फाका पडण्याचा संभव असेल, तर एकही किडा पिकणार नाहीं. ह्मणजे किड्यांचें खाण्याचें जें प्रमाण ठरलेले आहे, तितका पाला किड्यांनी खाल्याखेरीज ते पिकून रेशीम वाल- णार नाहींत. लागवडीवर सडकेचा धुरळा येऊन बसेल, अशा ठिकाणी लागवड करूं नये. धुरळा बसलेला पाला किड्यांनी खाल्यास त्यांस काजळ्या रोग होण्याचा संभव आहे. लाग- वडीवर दंव पडलें असेल, व त्यानें पाला ओला झाला असेल, अशा वेळी पाल्याची छाटणी कधींही करूं नये. सर्व पाल्यावरील ओलावा नाहींसा झाला, ह्मणजे पाला घरांत आणून सांठ- वून ठेवावा. भिजलेला ओलसर पाला किड्यांनीं खाल्यास त्यांस बिलोरी रोग होतो. ह्मणून ओलाव्याचा पाला किडयांस खावयास कधींही घालूं नये. किड्यांचे घरांत किड्यांस चौबीस घंटे पुरेल, इतका पाला हमेशा साठ्यांत असावा, अशा रीतीनें पाला कापून आणून ठेवीत जावा. प्रत्येक वेळीं पाला कापून आणून घालीत गेल्यास पहांटेचे वेळीं दंव पडल्यानें अथवा अवांतर वेळीं एकाएकी पावसाने पाला ओला झाल्यास तो सुकवून किड्यांस घाली पावेतों त्यांस चारा घालण्याचे वेळेत बदल होतो. ह्मणून अगोदर चौबीस घंटे पाला आणून सांठविणें श्रेयस्कर होय. कधीं कधीं पावसाळ्यांत दोन दोन चार चार दिवस सारखा पाऊस पडत असतो. अशा वेळी पाला कापून आणून त्यावरील पाणी झाडून भिंतीस टेकून सर्व फांद्या वर शेंडे करून ठेवाव्या. व नंतर पंख्यानें अर्धा घंटा त्यावर वारा घालावा. ह्मणजे पाल्यावरील सर्व ओलावा