पान:तुतीपासून रेशीम.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४१ असतां हरकत नाहीं. किड्यांस प्रथमारंभीं कोवळा पाला घालावयाचें मुरू करून नंतर जून पाने खावयास घालावी. किड्याचे पहिल्या स्थितीत जून पाला घालून मागून कोवळा पाला घातल्यास त्यांस बिलोरी रोग होतो. ह्मणून आधीं जून व नंतर कोवळा, अशा रीतीनें पाला कधीं घालूं नये. किडे पाळावयाचें काम सुरू केलें, ह्मणजे आपलेपाशीं जितका कोवळा पाला असेल, तितका प्रथमारंभीं घालून नंतर जून पाल्याकडे हात वळवावा. ज्या दिवशी किडे पिकतील असें वाटत असेल, त्या दिवशीं जून पाला किड्यांस खाऊं घातला असतां विशेष चांगलें. एकसारख्या एकाच लागवडीतून पाला किड्यांकरितां घेत गेल्यास किडे जसजसे मोठे होतील, तसतसा पालाही वाढीच्या योगानें जून जून होत जातो. क्वचित् प्रसंग आपल्या जवळील पाला खलास झाल्या कारणानें दुसरीकडून पाला आणावा लागेल, तर जो पाला आपल्या पाल्यापेक्षां त्या वेळेस अधिक अथवा बरोबरीनें निवर किंवा जून असेल, तोच खरेदी करावा. किडे पाळण्याच्या सुरवातीसच आपला पाला अखेरीस कमी पडेल असें वाटत असेल, व दुसऱ्या विकतच्या व घरच्या पाल्यावर किडे पाळावयाचा विचार असेल, व इतरांच्या लागवडीचा पाला आपल्या लागवडीपेक्षां जास्त कोवळा असेल, तर तो पाला किड्यांस आधीं घालून नंतर आपला पाला उपयोगास आणावा. अखेरीच्या वेळेस जर एक वेळ पाला कमी असेल, वं दुसरीकडूनही मिळणार नाहीं, व त्यामुळे किड्यांस अजीबात