पान:तुतीपासून रेशीम.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४० एखादी गैरसोय असली, तरी त्या मानानें त्यांत फायदाही बराच आहे. ह्मणून आह्मी ह्मणतों त्याप्रमाणें वागणें वरें. तुतीचे झाडांस शेणकी, तळ्यांतील गाळ, राख, सोरा अथवा सोन्यांतील गाळ चांगला मानवतो. लागवड फिकट दिसल्यास सोन्याचें पाणी शेतास दिल्यास अथवा मोन्यां- तील गाळ घातल्यास पाल्याचा रंग गहिरा हिरवा दिसतो. म्हैसुरी लागवडीकरितां रोप तयार करणें, कलमें तयार करणें, तसेंच जमीन तयार करणें, वगैरे क्रिया बंगाली लाग- बडीप्रमाणेंच कराव्या. बंगाली लागवडीमध्ये प्रत्येक जागीं सहा सहा कलमे लावतात. पण मैसूरकडे एक एक कलम दीड फुटाचे अंतरावर लावतात. बंगालमध्ये पाला घ्यावयाचा तो प्रत्येक वेळी जमिनीपासून हरहमेश झाडांची छाटणी करून घेतात. मैसूरकडे पानें तोडून घेतात, व सालांतून त्याची एक वेळ छाटणी करतात. तळापासून छाटणी करून घेतल्याने थोड्या वेळांत लागेल तितका पाला जमा करून घेतां येतो. दोन मण पाला पाहिजे असल्यास तो एक मनुष्य बंगाली तऱ्हेनें अर्ध्या तासांत छाटणी करून आणूं शकतो. पानें तोडून दोन मण पाला जमविण्यास निदान तीन घंटे तरी लागतात. ह्मणजे, एक एक पान तोडून पाला जमविण्यापेक्षां डाहळ्या तोडून पाला जमविणें मजुरीच्या दृष्टीने काटकसरीचें आहे. किड्यांनी दोन वेळ काती टाकल्यावर, ह्मणजे किड्यांच्या तिसन्या स्थितीत, पाला तोडून घालण्याऐवजीं बारीक बारीक डाहळ्या किड्यांस घातल्या