पान:तुतीपासून रेशीम.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३९ तऱ्हेच्या लागवडीचा पाला सर्व तऱ्हेच्या रेशमाच्या कि- ड्यांस चांगला मानवतो. बंगाली लागवडीवर पाळलेल्या किड्यांस विटोरी रोग होतो, असें कित्येक ह्मणतात. व तें कांहीं अशीं खरेंही आहे. पण असल्या पाल्यावर किडे पाळीत असतांना, दर दोन चार दिवसांनी, किडे पाळण्याच्या घरांत येणाऱ्या बाहेरील हवेचा चार घंटे अवरोध करून, पक्या भाजजेल्या चून्याच्या कळ्या उघड्या ठेवल्या, तर त्यांच्या हवेंतील आर्द्रताशोपणशक्तीनें आंतील हवा त्या रुक्ष बनवतील, व त्या किड्यांत फाजील झालेली आर्द्रता शोषण करतील, व या योगानें त्यांस बिलोरी रोग होण्याची धास्ती रहाणार नाहीं. बंगाल्यांत तुरीचे लागवडीस क्वचितच पाणी देतात. पण पाणी दिल्याने लागवड भराव्याने वाढते. फरक इतकाच कीं, जमिनीस दिलेल्या पाण्याचें त्यांतील तुतीचे झाडांनीं अधिक शोषण केल्यानें त्यांच्या पाल्यांतही रस जास्त होतो, व असला पाला किड्यांनी खाल्यास त्यांस बिलोरी रोग होण्या- चा संभव असतो. पण यासही वरप्रमाणे व्यवस्था ठेव- ल्याने धास्ती बाळगण्याचें कारण नाहीं. आतां कोणी असें ह्मणेल कीं, अशी जर स्थिति आहे, तर झाडांना पाणी देण्याचे काय प्रयोजन आहे. वर वर पहातां हें जरी खरें दिसतें, तरी पाणी दिल्यानें अधिक प्रमाणांत पाल्याची आमद होते, व त्यापासून अधिक फायदा काढतां येतो. जरी यांत