पान:तुतीपासून रेशीम.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३८ अशा वेळचा पाला किडे पाळावयाचे कामी अगदीच निरु- पयोगी होय. असला पाला किड्यांस घातल्यास विलोरी क काजळ्या हे दोन्ही रोग उद्भवतात. ह्मणून पाणी ओस- रल्याबरोबर सर्व लागवड बुंधापासून छाटून काढावी, व पुढचे वेळेचा पाला किडे पाळावयास घ्यावा. ज्या झाडांची पानें दुरमडलेलीं असतात, ह्मणजे ज्या पानांवर बारीक पुरळ येऊन दुरमडलेलीं असतात, असली पानें किड्यांनी खाल्यास किड्यांस रोग होऊन ते मरतील. ह्मणून असला पाला किड्यांस खावयास घालूं नये. कधीं कधीं तुर्ताचे पानावर किरळ पडतो, ह्मणजे पानाचे पाठीमागील बाजूस बारीक काळसर कीड होते. अशी कीड लागवडीत आढळल्यास ते बुंधापासून छाटून त्याच्या फांद्या लांब नेऊन जाळून टाकाव्या. असला पाला किड्यांनी खाल्यास ते मरतात. हा झाडांचा रोग इतका भयंकर आहे कीं, थोडे दुर्लक्ष्य केल्यास सर्व लागवड त्याने व्यापली जाते. ह्मणून प्रत्येकाने लागवडी- च्या रोगाकडे व किरळाकडे लक्ष द्यावें. एक एकराची पहिल्याने लागवड तयार करण्यास दोनशे रुपये पावेतों खर्च येतो. व जोपासनेकरितां फार तर सालिना शंभर रुपये लागतात. फक्त पाल्याचें उत्पन्न सालिना तीनशें रुपयांपासून पांचशे रुपयांपावेतों होतें. ह्मणजे जेथें किडे पाळावयाचें काम चालू आहे, तेथे किडे पाळणारास पाला विकून सालास दीडशे रुपयांपासून तीनशे रुपये पावेतों एका एकरापासून निवळ फायदा मिळू शकतो. बंगाली