पान:तुतीपासून रेशीम.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३७ ories करण्याविषयीं मागें सांगितल्याप्रमाणे लागवड कर ण्यास चुकूं नये. मुर्शिदाबाद वगैरे बाजूंकडे कांहीं अनु- भविक मनुष्ये एका एकर पासून ४५० ते ५०० मण पावेतों पाला काढून घेतात. लावलेल्या झाडांपैकी मधली कांहीं झाडें मेल्यास ती काढून त्यांच्या जागीं पुन्हां कलमें आणून लावावीं. पाल्याने शेत भरलें, ह्मणजे फारच मजे- दार दिसतें. लागवडीस सालांतून एक वेळ पानमळ्या- सारखी भर व एक वेळ खत द्यावें लागतें. भर जी वालावयाची ती तळ्यांतील मातीची घातल्यास अति उत्तम. नाहीं तर सभोंवती चर खणला असेल, त्यांतून दरसाल उकरून भर देत जावी. दरसाल भर व खत दिल्याशिवाय बंगाली त-हे- च्या झाडांची लागवड चांगल्या स्थितीत ठेवणें अशक्य आहे. इतकेंच नव्हे, तर लागवड हातची जाते. लागवड करून वर्ष झाल्यावर महिन्यांतून एक वेळ पाणी दिलें, ह्मणजे पुरते. एकाद्या हंगामांत कांहीं कारणाने आपणास किडे पाळण्यास वेळ नसेल, किंवा आपलेपाशीं वीं तयार नसेल, तरी लागवडीची छाटणी ही झालीच पाहिजे. छाटणी जर झाली नाहीं, तर झाडे उंच वाढून जवळ जवळ झाल्या कारणानें मरून जातील. ह्मणजे, किडे पाळा अथवा नका पाळू, पण जर झाडें पांच फूट उंचीची झाली असतील, तर त्यांची बुंध्यांपासून छाटणी केलीच पाहिजे. पावसाचे पाणी लागवडीत सांचून त्यांत लागवड बुडून गेली असेल, व कांहीं काळानें पाणी ओसरले असेल, तर ४