पान:तुतीपासून रेशीम.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३६ जनावरांस चांगला मानवतो. छाटणी केल्यानंतर दोन महि- न्यांत मशागत चांगली झाली असल्यास तीन ते साडेतीन फूट उंचीची लागवड वाढते, व ह्या वेळचा पाला किडे पाळावयाचे उपयोगास येतो. जर लागवड जून महिन्यांत केली असेल, तर धुमाऱ्याचा पाला, ह्मणजे कापून टाकाव याचा पाला, आगस्टमध्ये येऊन किडे पाळावयास योग्य असा पाला आक्टोबरमध्ये मिळू लागतो. ह्मणजे लागवड केल्या- पासून सहा महिन्यांनी किडे पाळावयाच्या योग्यतेचा पाला तयार होतो. लागवड जर सप्टेंबरमध्ये केली असेल, तर डिसेंबरमध्ये लागवड तयार होते, व जानेवारींत लागवड . केल्यास मे महिन्यामध्ये लागवड तयार होते. किडे पाळा - वयाकरितां जो पाला घ्यावयाचा तो झाडें बुंधापासून कापून घ्यावा, व पुन्हां खोदणी करून वर सांगितल्याप्रमाणें त्यावर बुंधे बुजतील अशी मातीची भर वालावी. भर दिल्यापासून व कापल्या दिवसापासून दोन महिन्यांचे आंत पाला तयार होतो. याची लागवड पांच फुटांपेक्षां जास्त उंचीची केव्हांही वाढू देऊं नये. नाहीं तर झाडांची जवळ जवळ दाट लागण केलेली असल्यानें त्यांच्या मुळांस पसरण्यास यथास्थित वाव न सांपडल्यानें मरून जातील. पाला कापा- वयाचे हंगाम जानेवारी, मार्च, मे, जुलै, सप्टेंबर व नोवें- बर हे होत. एका एकरांत जर लागवड चांगल्या तऱ्हेनें केली, तर सहा हंगामांत मिळून २५० ते ३०० मण पावेतों पाला मिळण्यास हरकत नाहीं. असा पाला मिळावयास •