पान:तुतीपासून रेशीम.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३५ अथवा विटेचे तुकडे अथवा भाजलेली माती घातल्यास तीं लवकर फुटतात. कलमें मृगाचे सुरवातीस लावाव- याची असल्यास अर्धी जमिनींत व अर्धी जमिनीवर राह- तील, अशीं एकएके जागीं सहा सात याप्रमाणे लावावीं. जर सप्टेंबरमध्ये लावण्याचीं असतील, तर चवथा हिस्सा कलमें जमिनीवर रहातील अशीं लावावीं. व जानेवारीत लावाव- याची असतील, तर फक्त बोट दोन बोटें वर रहातील अशीं लावावीं. सप्टेंबरमध्यें व जानेवारीत लावावयाची असल्यास सन्यांचे सखल जागेत लावावी. व मृगाचे सुमारास लागण करावयाची असल्यास सत्यांवर लागण करावी. लागवड झाल्याबरोबर पाणी द्यावें. नंतर महिनाभर दर चार दिव- सांनीं एक वेळ याप्रमाणें पाणी द्यावें. व दुसरे महिन्यांत आठ दिवसांतून एक वेळ याप्रमाणे पाणी द्यावें. दीड महिन्याचे सुमारास सर्व लागवड एकसारखी फूट दीड फूट उंचीची होईल. इतक्या उंचीचीं कलमें वाढल्यावर सर्व लागवड तळापासून छाटून काढावी, व सन्यांच्या बाजूची माती खणून झाडांचीं बुं बुजतील अशी त्यांवर दोहों बाजूंची भर द्यावी. नंतर महिन्यांतून एकदा पाणी दिलें ह्मणजे पुरे. कोठें कोठें महिन्यांतून दोन वेळ पाणी देतात. पाणी दिल्यापासून नुकसान न होतां उलट फायदाच होतो. पहिले छाटणचे पाल्यावर किडे पाळल्यास बिलोरी नांवाचा त्यांस रोग होतो. ह्मणून पहिल्या खेपेच्या छाटणीचा पाला किड्यांस न घालतां जनावरांस घालावा. तुतीचा पाला