पान:तुतीपासून रेशीम.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३.४ मृगाचे सुमारास, अथवा साधारणपणें सप्टेंबरमध्यें, लागव- डीस सुरवात करावी. बियांपासून लागवड करावयाची अस- ल्यास आपलेजवळ जें तरू तयार असेल, त्यांतील पांच सहा रोपें एका हातांत घ्यावीं, व दुसऱ्या हातांत पसरट खुरपे घेऊन त्यानें सरीत भोंक पाडून मुळे न दुमटतील, अशीं फुटा- फुटाचे अंतरावर एकएका जागीं सहा सात रोपे लावावीं. कलमाच्या योगानें लागवड करावयाची असल्यास एका जागी सहा सहा कलमें याप्रमाणें फुटाफुटाचे अंतरावर लावावीत. कलमें लावण्याकरितां आणावयाचीं तीं आंगठ्यापेक्षां जाड नसावी. व त्यांचा रंग काळसर पांढरा अथवा काळसर असावा. या कलमांची लांबी एक फुटाची असावी. कलमें चांगलीं सफइदार कापण्याची विशेष खबरदारी घ्यावी. नाहीं तर कलमें पिंजलीं असल्यास तीं लागत नाहींत. वाकडें तिकडें कापलेल्या कलमांस फुटण्यास सफाईदार कापलेल्या कलमांपेक्षां जास्त वेळ लागतो. कलमें सावलीत ठेवून त्यांवर रोज पाणी शिंपीत राहिल्यास तीं एक महिनाभर देखील लागवडीलायख राहू शकतील. तरी पण तीं कापून त झाल्याबरोबर लागवड केल्यास अधिक श्रेयस्कर आहे. कलमें लावावयाचीं तीं तिरपी लावावीत. कलमे लावतांना बुडाशी कौलाचे तुकडे घातल्यास तीं अधिक लौकर फुटतात. ही रीत सर्व जातीच्या कलमांचे लागवडीस फार चांगली आहे. विशेषतः ज्या जातीच्या कलमांस फुटण्यास ज्यास्त वेळ लागतो, अशा कलमांच्या बुडाशीं कलाचे