पान:तुतीपासून रेशीम.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३३ गाळ, गुरांचें कुजलेले शेण, हमेषा गदळ पाणी वाहणाऱ्या मोऱ्यांतील गाळ, हीं खतें उत्तम मानवतात. या सर्वांचा उपयोग जमिनीचे मशागतीचे वेळीं केल्यास अधिक चांगलें. याप्रमाणें जमीन तयार झाल्यावर तिचे चारी बाजूंस एक हात रुंद व एक हात खोल, असा चर खणून त्याची माती आंतील अंगास टाकावी. ह्मणजे जमिनीच्या चारी बाजूंस कट्टा घातल्यासारखे होईल. नंतर त्यास चांगले दाट कुंपण करावें. एकदां लागवड केल्यावर पंचवीस वर्षे पुन्हां लागवड करण्याची जरूर नसते. ह्मणून दोरीच्या साहाय्याने दीड फुटीच्या अंतरावर सारख्या सन्या कराव्या, व त्या चांगल्या तापू द्याव्या. व नंतर समांतर अंतरावर चोहों बाजूनें एकसारखी लागवड करावी. समांतर अंतरानें केलेली बंगाली लागवड जवळ जवळ पंचवीस वर्षे टिकणारी असल्याने दिसण्यांत ती चांगली दिसते. तसेंच त्यांतील सर्व झाडांस एकसारखी जागा फैलावण्यास मिळाल्याने जमिनीं- तील असणारे सत्त्वांश सर्वांस एकसारखे मिळतात. व त्यानें लागवड सर्व एकसारखी राहते. दुसरें असें कीं, त्या झाडांस खताचे द्वारा ज्या ज्या द्रव्यांचा पुरवठा केला जात असतो, तीं सर्वांस एकसारखीं मिळतात. लागवड समांतर असल्यानें त्यांत कोळपें वगैरे फिरवण्यास सोईचें जातें. अर्थ इतकाच कीं, लागवड, मग ती कोणचीही असो, समान अंतराने एकसारखी केल्याने सर्व प्रकारें सोईचें असतें.