पान:तुतीपासून रेशीम.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३२ खूप ढवळावें, व त्यांत अर्धा भाग मोरचुदाची भुकणी टाकून मोरचूद विरघळल्यावर पिचकारीनें आसपासची झाडें धुवावी. ह्मणजे रोगट जंतु फैलावले असतील, तर त्यांचा नाश होतो. कधीं कधीं असा रोग लागवडींत आढळल्यास वरील मिश्र पाण्याचे गाडगे पाटाचे पाण्यावर ठेवून त्यास बारीक भोंक पाडावें, व त्यांत चिंध्यांचा कांकडा अशा रीतीनें घालावा कीं, त्यांतून एक एक ठिपका पाटाचे पाण्यांत पडत असावा. अशा रीतीनें पाणी दिल्यास लागवडीतील रोगाच्या फैलावास प्रतिबंध होईल. बंगाली तन्हेच्या तुतीची लागवड करण्यास जमीन कोण- त्याही जातीची असली, तरी चालते. परंतु त्याचे लागवडी- करितां जितकी चांगली जमीन घ्यावी, तितकें चांगलें. त्याचें उत्पन्न अधिक असल्या कारणाने चांगली जमीन याचे लागवडीने अडविल्यास नुकसान नसतें. लागवडीकरतां जमीन पसंत केल्यावर ती बारा बैलांचे नांगरानें आडवी उभी अशी चार वेळ नांगरून काढावी. नंतर चार बैलांचे नांग- रानें चार वेळ नांगरठी करून जमीन उन्हांत तापू द्यावी. प्रत्येक एकरास वीस गाड्या शेणकी व दहा गाड्या राख जमिनीवर पसरून पुन्हा दोन वेळ चार बैलांच्या नांगराने नांगरून घ्यावी. व पंधरा दिवसाचे अंतराने दोन वेळ याप्रमाणे सहा वेळ कुळवाच्या पाळ्या घ्याव्यात. ह्मणजे जमिनीवर चांगलें फूल येऊन जमिनींतील माती पिठासारखी बारीक होईल. तुतीच्या झाडास राख, सोरा, तळ्यांतील