पान:तुतीपासून रेशीम.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३१ कापराचें पन्नास भाग पाण्याशी एका स्टॉपर्स बाटलीत मिश्रण करून त्या पाण्यांत तें वीं एक घंटाभर ठेवून नंतर तें लागवडीस उपयोगांत आणावें; ह्मणजे, तें तयार केलेल्या वाफ्यांत लावावें. ज्या जातीच्या फळझाडाचें अथवा भाजी- पाल्याचें बी रुजत नाहीं, त्या जातीचें बीं कापराचे पाण्यांत वर सांगितल्याप्रमाणे तयार करून पेरल्यास लौकर व चांगल्या तऱ्हेनें रुजतें. अशा रीतीनें लावलेल्या बीजांची रोपडी चांगली तयार होतात. तुतीचें वीं बारकि असतें. याकरितां तें सर्व वाफ्यांत सारखें पडावें, ह्मणून त्यांत बरोबरीनें राख मिसळावी. दररोज सकाळी व संध्याकाळी पहिले चार दिवस झारीने पाणी घालीत जावें. नंतर दोन दिवसांनी एकदां पाणी घालावें. तरु वर येऊन दोन दोन पानें फुटली, ह्मणजे तीन दिवसांनी एक वेळ या- प्रमाणे पाणी देत जावें. रोप सहा अंगुळें उंचीचें झाल्यावर त्यास आठ दिवसाचे अंतराने पाटाने पाणी द्यावें. रोपं बारा अंगुलें उंच झाल्यावर एक एक फुटाचे अंतरावर जमि- नीत लावावें. तरू लहान असतांना त्यास मुंग्यांपासून फार जपावें. व त्यास दुसरी एक काळसर कीड लागते, ह्मणून पाठांत खड्डा करून त्यांत शेराच्या नांग्या टाकून अर्धा शेर मिठाची पुरचुंडी टाकावी, व पाटाचें पाणी त्यांत सोडून त्यांतून पाणी वाफ्यांत जाईल, अशी योजना करावी. रोगानें अथवा किडीने लागवड व्यापली गेल्यास चार भाग ताक, एक भाग घासलेट तेल व दहा भाग पाणी, यांचे मिश्रण करून