पान:तुतीपासून रेशीम.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

.३० पिकून खालीं पडलेलीं फळें जमा करून स्वच्छ थाळींत हातांनी साधारण चुरडावी, व त्यांत तांब्या दोन तांबे पाणी घालून खूप ढवळावें. नंतर हलकेच त्यांतील पाणी ओतून जो गर शिल्लक राहिलेला असतो, तो हलक्या हाताने पुन्हा चुरडून पुन्हा धुवावा. याप्रमाणें सहा सात वेळ करावें. पाणी ओतीत असतांना तें इतक्या हुपारीनें ओतावें कीं, आंतील बीं पाण्याबरोबर बाहेर जाऊं नये. नंतर तळास सालपटासारखें बारीक वीं राहिलेलें आढळेल. तें कापडामध्ये घालून चेपावें व नंतर सावलीत वाळवावें. बीं उन्हांत वाळविल्यास त्याची रुजण्याची शक्ति नाहींशी होईल. बी सावलीत चांगले सुकें झाल्यावर स्वच्छ बाटलीत सांठवून ठेवावें. फळझाडाचे अथवा भाजीपाल्याचे वृक्ष चांगल्या रीतीनें तयार कराव- याचे असल्यास पुढील रात बरी, असें माझे अनुभवास आलें आहे. झाडाचा वाळलेला पाला कुजवून त्याचें चांगलें खत करावें. व असें खत दोन भाग, एक भाग राख व एक भाग माती, यांच्या मिश्रणाचे वाफे तयार करावे. नंतर बी आणून एका पणतीत दोन तोळे गंध- काची भुकणी घालून ती विस्तवावर ठेवावी. पणतींतील गंधकाने पेट घेतल्यावर ती पणती जमिनीवर ठेवून जाळी- दार भांडें तीवर झांकण घालावें, व त्यावर बियांची पुरचुंडी ठेवून एक मोठा बारीक भोंकाचा कुंडा त्या सर्वांवर झांकण घालावा. याप्रमाणें तें बीं तसेंच एक तास जवळ जवळ राहू देऊन नंतर तें त्यांतून काढावें. नंतर एक भाग