पान:तुतीपासून रेशीम.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२९ पाळणारांस कांहीं उपयोग होईल, असें वाटत नाहीं, हैं होय. लागवडीकरितां जी जात पसंत करावयाची, ती पुढील- प्रमाणे करावी. ज्या जातीचा पाला दडस अथवा चिवट असतो, ती जात पसंत न करितां ज्या जातीचा पाला मऊ लुसलुशीत किंवा दळदार असतो, जी जात लवकर वाढणारी असते, जी जात लवकर लागास येते, व ज्या जातीस विपुल पाला असतो, अशा जाती पसंत कराव्या. वागांतून व पानमळ्यांतून वारीक फळांची जी जात हमेपा नजरेस पडते, ती लागवडीस घेतली असतां चालेल. सर्व रेशमाचे किड्यांमध्ये छोटे किड्यांची जात अतिशय नाजूक असते. व ह्मणून या जातीचे किड्यांची बंगाली लाग- वर्डाच्या लुसलुशीत पाल्यावर अथवा मुंबई प्रांतांतील तुतीच्या स्निग्ध पाल्यावर जोपासना फार चांगली होते. तुतीची लागवड बीजापासून अथवा कलमापासून होते. हिमालय पर्वतावर हरहमेश जी तुतीची जात आढळते, तिची लागवड केल्यास उत्तम. या झाडाचें वीं मनमुरीच्या नरसरीमधून मिळू शकते. तसेंच क्यालीपांग हिमालयन् डिस्ट्रिक्ट येथील मिशनरींस मार्च महिन्याचे सुमारास लिहिल्यास त्याची किंमत घेऊन ते पाठवू शकतात. तसेंच काश्मीरचे रेशमाचे कार- खान्याचे सुपरिंटेंडेंट यांस लिहिल्यास तेही पाठवू शकतील. एप्रिलमध्ये बहुतेक सर्व जातीचे तुतींस फळांचा सर्वांत मोठा बहार येतो. त्या वेळीं पहिल्या प्रतीचें वीं मिळू शकतें. तें जमवून त्यापासून बी काढावयाचें असल्यास चांगलीं