पान:तुतीपासून रेशीम.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८ पाला. किडे पाळावयाचें मुख्य साधन ाटलें ह्मणजे तुतीचा पाला हैं होय. आपणापाशी किती पाला आहे, अथवा किती पाला आपणांस मिळू शकेल, हें अगोदर पाहिलें पाहिजे. आतां पाला कसा मिळवावा, अथवा तो मिळविण्यास कशी लागवड करावी, याचे सविस्तर विवेचन येणेंप्रमाणे :- आपल्या इकडे रेशमाचे उत्पन्नाकरितां तुतीची लागवड चार तऱ्हेनें करितां येते. बंगाली लागवड, मैसुरी लागवड, चिनी लागवड व मोठे झाडांची लागवड. तुर्ताच्या जाती अनेक आहेत. सर्व तऱ्हेच्या तुतीचा पाला रेशमाचे किड्यांस उपयोगी पडतो, असें नाहीं. आपले इकडील गांवांतील बागांतून वयाच जातीच्या तुती आढळतात. कांहीं जातीच्या झाडांस तोकडीं फळें येतात, कांहींस लांब फळे येतात, व कांहीं जातीच्या तुतींना सहा सहा इंच लांबीची देखील फळे येतात. कांहीं जातीच्या तुतींचीं पाने बारीक असतात, तर कांहीं जाती- च्या तुतींची पाने एक एक फूट व्यासाचीं असतात. कांहीं जातीच्या पानांवर कांड्याची लव असते, व तीं त्या योगानें व कांहींची पानें मऊ असतात. कांहींचीं खरबरीत असतात, दडस, , तर कांहींचीं चित्रट असतात. तुतीला इंग्रजी वनस्पति- शास्त्रांत 'मोरस अलबा' हें नांव आहे. त्यांत 'मोरस आलवा, ' 'मोरस इंडिका,' ‘मोरस मॅल्टीकूलीस' इ० अनेक भेद आहेत. ते सर्व न देण्याचें कारण त्यांचा आमचे एकमार्गी किडे