पान:तुतीपासून रेशीम.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७: शेरभर तेल व शेरभर बिवे याप्रमाणें असावें. ज्या ज्या वेळेस किड्यांस पाला घालतात, त्या या वेळेस चौखुराचे पायास लावलेलें तेल वाळलेलें आहे कीं काय, तें अवश्य पाहिलें पाहिजे. व तें वाळले असल्यास पुन्हां लावावें. एकदा जर मुंग्यांचा प्रवेश सुपलींत झाला, तर त्या थोड्याच वेळांत बहुतेक सर्व किड्यांचा फन्ना उडवतील. कित्येक ठिकाणी एका एका चौखुरावर सोळा ते आठरा पावेतों सुपल्या ठेवतात. पण असें करणें किड्यांस वैद्यक दृष्ट्या चांगले नाहीं. एका चौखुरावर बारापेक्षां जास्ती सुपल्या ठेवू नयेत, व कमीही ठेवणें काटकसरीच्या नियमाने चांगलें नव्हे. दहा ते बारा सुपल्यांपेक्षां कमी सुपल्या ठेवणें ह्मणजे खर्च विनाकारण जास्त वाढवणें व घराची जागा जास्त व्यापणें आहे. दहा ते बारा सुपल्या ठेवण्यापासून रोग उद्भवण्याचें मुळीं देखील भय नाहीं. एका चौखुरावर वारा सुपल्या ठेवून काम करणारे लोक युरोपांत व हिंदुस्थानांत हजारों आहेत. पांच सहाच सुपल्या एका चौखुरावर ठेवाव्या, असें ह्मणणें चुकीचें आहे. त्यापासून जास्त जागा आडवली जाते, व विनाकारण जास्त चौखूर करावे लागतात. सारांश, असें करणें ही कांहीं व्यापारी दृष्टि नव्हे. किडे पाळावयाचें काम झाल्यानंतर सर्व शिड्या काढून मोरचुदाचे पाण्याचे मिश्रणाने धुवून घरास गंधकाची धुरी देतांना त्यांत ठेवून धुरी द्यावी. आणि नंतर तें सामान पुन्हां किडे पाळण्याच्या उपयोगास आणावें.